Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येणार ? ललिल प्रभाकर स्पष्टच म्हणाला की, तो काळ….

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा दुसरा भाग यावा असं आदित्यच्या चाहत्यांचं म्हणणं आहे यावर तुला काय वाटतं आदित्य आणि मेघनाची जोडी पुन्हा एकदा टिव्हीवर दिसायला पाहिजे का ? यावर ललितने स्पष्टीकरण दिलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 13, 2026 | 02:47 PM
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येणार ? ललिल प्रभाकर स्पष्टच म्हणाला की, तो काळ….
Follow Us
Follow Us:
  • ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येणार ?
  • ललिल प्रभाकर स्पष्टच म्हणाला की तो काळ….
Lalit Prabhakar On The Sequel Of Julun Yeti Reshimgathi: झी मराठीच्या मालिका आणि प्रेक्षकांचं एक वेगळंच नातं आहे. आभाळमाया, वादळवाट, दिल दोस्ती दुनियादारी याप्रमाणेच लक्षात राहिलेली आणखी एक मालिका म्हणजे जुळून येती रेशीमगाठी. या मालिकेवर आजही प्रेक्षक तितकंच प्रेम करतात. मालिका संपून कित्येक वर्ष लोटली पण आजही सोशल मीडियावर आदित्य आणि मेघनाचे रिल्स व्हायरल होतातच. मालिकेतील देसाई कुटुंबातील एकमेकांविषयीची आपुलकी आणि प्रेम हे चाहत्यांचा मनात कायम आहे. आजंही हे कुटुंब प्रत्येकाला आपलंसं वाटतं. खरंतर जुळून येती रेशीमगाठी या मालिकेने ललित आणि प्राजक्ता घराघरात पोहोचले. आज या दोघांनीही त्यांच्या करिअरमध्ये खूप यश आणि प्रसिद्धी मिळवली खरं पण आजंही त्यांना आदित्य आणि मेघना या नावानेच सर्वात जास्त ओळखलं जातं. आजही या मालिकेचा दुसरा भाग यावा असंही चाहत्यांना वाटत असतं. याबद्दलच ललितने एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा दुसरा भाग यावा असं आदित्यच्या चाहत्यांचं म्हणणं आहे यावर तुला काय वाटतं आदित्य आणि मेघनाची जोडी पुन्हा एकदा टिव्हीवर दिसायला पाहिजे का ? यावर ललितने स्पष्टीकरण दिलं. ललित म्हणाला की, या मालिकेचा दुसरा भाग यावा असं मला वाटत नाही. तो काळ तसा होता. तेव्हा दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांची तशी रेशीमगाठ जुळून आली आणि मालिका प्रेक्षकांना आवडली. तेव्हाच्या त्या काळातली ती जादू होती. ते तसंच छान आहे आणि त्याला धक्का लागायला नको असं मला वाटतं. प्रत्येक काळाची एक एनर्जी असते. त्यामुळे मला नाही वाटत की, त्याचा दुसरा भाग यावा, असं ललितने एका मुलाखतीत सांगितलं.

Video: अभिनेता, कवी आणि आता गायकदेखील; संकर्षण कऱ्हाडेच्या आवाजात नवं गाणं, व्हिडीओवर चाहते फिदा

ललितच्या कामाबाबत सांगायचं झालंच तर, सध्या त्याचा नवा सिनेमा सुपर डुप्परचं प्रमोशन सुरु आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सुरु असलेल्या गप्पांमध्ये त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. मालिकेच्या आठवणी सांगताना ललित म्हणाला, इतर मालिकांच्या तुलनेत आमची मालिका काहीशी वेगळी होती. जुळून येती रेशीमगाठीचं वेगळेपण म्हणजे या मालिकेत कोणतंही खलनायक किंवा नायिकेचं पात्र नव्हतं. मालिका कौटुंबिक होती आणि त्यातील पात्र हे कलारांनी, लेखकांनी आणि दिग्दर्शकाने इतके जिवंत ठेवले की पाहणाऱ्या प्रेक्षकाला ते आपले वाटायला लागले. आणि तिथेच मालिकेने प्रेक्षकांचं प्रेम जिंकलं. “माझ्या करिअरमध्ये ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिका खूपच महत्त्वाची होती. अगदी आजही मला सोशल मीडियावर रोज मेसेजेस येत असतात की, आम्ही सात ते आठ वेळा ही मालिका पाहिली. हे प्रेम खूप जास्त आहे. त्यावर कशा पद्धतीनं व्यक्त व्हावं मला कळत नाही; पण या प्रेमानं मला भारावून जायला होतं, असं ललितने सांगितलं.

Asha Bhosale : ‘गाणं खरेपणाने गा…फक्त सुंदर गाऊ नका’, आशा भोसलेंच्या ‘जैत रे जैत’ च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा ‘तो’ किस्सा

 

 

 

 

Web Title: Will there be a second part of the series juluun yeti reshimgathi lalil prabhakar gave a clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • prajakta mali
  • zee marathi

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.