नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय अनेक दिवसापासून प्रलंबित होता. या संदर्भात सुमारे चार वर्षापुर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय न्यायालयाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या संबंधित याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होणार असून ही सुनावणीही नागरिकांना लाईव्ह पाहता येणार आहे.
[read_also content=”औरंगाबादसह जालना जिल्ह्यात भगरीतून विषबाधा https://www.navarashtra.com/maharashtra/bhargar-poisoning-in-jalna-district-including-aurangabad-nrgm-330178.html”]
गेल्या तीन महिण्यापासून सुरू महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे. या बाबत 7 सप्टेंबर रोजी सुनावणीत पार पडली होती. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश स सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.