आजचा रंग आहे ग्रे, म्हणजे राखाडी किंवा करडा… हा परिपक्वतेचा रंग आहे…
“Gray Matter” refers to smarts, intelligence, brains, and intellect.. मानवी मेंदूचा रंग आहे हा….
अशाचं काही बुद्धिमान स्त्रिया ज्या हा समाज घडवतात त्यांचा आज जागर करुयात….
प्रत्येकच काळात अनेक स्त्रियांनी त्या वेळची समाजबंधने झुगारुन देऊन काळाच्या पाटीवर आपले नाव कोरले. अगदी गार्गी, मैत्रेयी पासून ते जिजाऊ, राणी लक्ष्मी बाई ते सावित्री बाई ते मदर तेरेसा अगणित नाव आहेत ज्यांची महती समाजाने मान्य केली.
परंतु त्यांचा मार्ग इतका सोपा कधीच नव्हता. पोलादी स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गारेट थॅचर म्हणतात, घर चालवायचं म्हणजे कोणत्या अडचणींचा सामना करायचा हे ज्या गृहिणाला कळू शकतं तिलाच देशासमोरील समस्या कशा सोडवाव्यात हे समजू शकतं.
सुशिक्षित, बुद्धिवान, चांगले कमावणार्या स्त्रियांना जगात, कुटुंबात, समाजात जास्त टीकेला तोंड द्यावे लागते हे उघड वास्तव आहे आणि मग त्याला बळी पडून स्वतःला पेलणार नाहीत इतकी अवास्तव उद्दिष्टे समोर ठेवून काम करणार्या स्त्रिया ही या जगात कमी नाहीत.
आज शिक्षणाच्या संधीमुळे अनेक स्त्रिया उच्चपदस्थ आहेत तरी पण भारतातील स्त्री शास्त्रज्ञांची संख्या कमीच आहे. मात्र त्यांच्या योगदानाचा दर्जा उच्च आहे. पोषणशास्त्रज्ञ कमला सोहोनी, इलेक्ट्रिकल इंजिनीअर राजेश्वरी चॅटर्जी, रसायनशास्त्रज्ञ असिमा चॅटर्जी, भौतिकशास्त्रज्ञ बिमला बुटी अशा प्रथितयश शास्त्रज्ञ स्त्रियांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले व करवूनही घेतले. हे प्रमाण कमी आहे, यामागे अनेक कारणे आहेत. कुटुंबाने, समाजाने ते समजून घेऊन मदतीचा हात स्त्रीपुढे केला, तर देशातले हे ५० टक्क्य़ांचे बौद्धिक भांडवल, बौद्धिक क्षमता आणि बौद्धिक वैविध्य वापरून देशाच्या प्रगतीत अधिक मोलाची भर पडू शकते. कुटुंबाने, संस्थेने, समाजाने काही गोष्टी समजून घेतल्या, तर योग्य संधी निर्माण करता येतील. याचा विचार व्हायला हवा.
अमेरिकेत आजकाल पती-पत्नी दोघेही शास्त्रज्ञ असतील तर एकाच ठिकाणी, एकाच शहरात कार्यक्षेत्र असावे यासाठी खास प्रयत्न केले जातात. आयएएस, आयटीएस अथवा बँकेतील अधिकाऱ्यांसाठी शक्य असेल, तर पती-पत्नींना एकत्र/जवळ राहता येईल, असे बघण्याचा नियमच आहे तसा आपल्याकडेही व्हायला हवा.
या सगळ्या प्रतिकुलतेवर मात करत, संशोधनाच्या वेगळ्या वाटा धूंडळणाऱ्या या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा!
भविष्यात या रंगाचं वर्चस्व वाढेल अशी आशा करूयात!!
– रश्मी पांढरे
९८८१३७५०७६