आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे रेकॉर्ड हे बऱ्याचदा कॉमेंटेटर असो किंवा अनेक बातम्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असे काही खेळाडू आहेत ज्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मैदानात गाजवले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत एक भारतीय आणि एक पाकिस्तानी आहे. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत एक भारतीय आणि एक पाकिस्तानी. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने १९९४ मध्ये वॉरविकशायरकडून खेळताना डरहमविरुद्ध नाबाद ५०१ धावा केल्या. बर्मिंगहॅमच्या मैदानावर ४२७ चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याने ६२ चौकार आणि १० षटकार मारले. लाराशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इतर कोणीही ५०० धावांचा आकडा गाठू शकले नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
पाकिस्तानचा हनीफ मोहम्मद दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १९५९ मध्ये कराचीच्या मैदानावर बहावलपूरविरुद्ध ४९९ धावांची खेळी केली होती. हनीफ कराची संघाचा भाग होता. त्याने त्याच्या खेळीत ६४ चौकार मारले. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये ४५२ धावांची नाबाद खेळी केली. त्यांनी न्यू साउथ वेल्ससाठी हा पराक्रम केला. ब्रॅडमन यांनी सिडनी स्टेडियमवर क्वीन्सलँडविरुद्ध ४६५ चेंडूंचा सामना केला आणि ४९ चौकार मारले. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
भाऊसाहेब निंबाळकर या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. १९४८ मध्ये महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफी सामन्यात निंबाळकर यांनी ४४३ धावांची नाबाद खेळी केली. पुण्याच्या मैदानावर काठियावाड संघाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ४९ चौकार आणि एक षटकार मारला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा भारतीय विक्रम अजूनही निंबाळकर यांच्या नावावर आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही भारतासाठी कसोटी सामना खेळला नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
ऑस्ट्रेलियाचा बिल पॉन्सफोर्ड या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने १९२७ मध्ये मेलबर्नमध्ये क्वीन्सलँडविरुद्ध ४३७ धावा केल्या. तो व्हिक्टोरिया संघाचा भाग होता. पॉन्सफोर्डने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोनदा ४०० पेक्षा जास्त धावा केल्या. १९२३ मध्ये त्याने तस्मानियाविरुद्ध ४२९ धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडीया