निरुपयोगी म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या पानांपासून बनवा कुरकुरीत चमचमीत भजी, नोट करून घ्या रेसिपी
पावसाळासह इतर सर्वच ऋतूंमध्ये सगळ्यांना भजी खायला खूप जास्त आवडते. भजीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. घरात कायमच कांदा भजी, बटाटा भजी किंवा पालक भजी बनवली जाते. बऱ्याचदा घरात भोपळ्याची भाजी पाहिल्यानंतर लहान मुलांसह मोठेसुद्धा नाक मुरडतात. पण भोपळ्याच्या भाजीचा आहारात समावेश करावा. भोपळ्याची पाने निरुपयोगी म्हणून फेकून दिली जातात. पण असे न करता या पानांपासून तुम्ही भजी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याच्या पानांची भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ग्रामीण भागात भाजीची पाने टाकून न देता त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भोपळ्याची भाजीच नाहीतर भोपळ्याची पाने सुद्धा शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. लोह, विटामिन सी आणि फायबर इत्यादी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या भाजीचे आहारात सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. चला तर जाणून घेऊया भोपळ्याच्या पानांची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
चिकन नाही यंदाच्या विकेंडला घरी बनवा ‘फिश टिक्का’, स्मोकी आणि मसालेदार चव कुटुंबाला करेल खुश






