अमेरिकेला दे धक्का! ट्रम्प यांच्या दबावानंतरही व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींनी फोन, जागतिक राजकारणात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या कारवाईनंतर आणि माजी अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाची भारतासोबत ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा आहे. या चर्चेमुळे भारताची जागतिक कुटूनीती अधिक ठळकपणे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, माझी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत भारत आणि व्हेनेझुएलाचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली.
व्हेनेझुएला (Venezuela) हा एक तेल संपन्न राष्ट्र आहे. यामुळे भारतासाठी व्हेनेझुएलाची भागीदारी उर्जा सुरक्षेसाठी अधिक महत्वाची ठरेल. भारताची व्हेनेझुएलाच्या तेल कंपन्यांमध्ये आधीच गुंतवणूक आहे. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत झाल्यास याचा भारताला मोठा फायदा होईल. यामुळे व्यापार आणि उर्जा क्षेत्रात दोन्ही देशांतील सहकार्य, गुंतवणूक दोन्ही देशांसाठी सकारात्म ठरेल.
Spoke with Acting President of Venezuela, Ms. Delcy Rodríguez. We agreed to further deepen and expand our bilateral partnership in all areas, with a shared vision of taking India-Venezuela relations to new heights in the years ahead. @delcyrodriguezv — Narendra Modi (@narendramodi) January 30, 2026
ही चर्चा अशा वेळी झाली आहे. जेव्हा जागतिक राजकारणा मोठा बदल होत आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील ५०% तेल साठा अमेरिकेच्या नियंत्रणाखाली घेतल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये तेल व्यापारा अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे ग्लोबल साउथमधील दोन सहकार्य या नव्या युतीमधून वाढण्याची शक्यता आहे.
भारत आणि व्हेनेझुएलाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेकांना पाठिंबा हा विकसनशील देशांचा आवाज मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तसेच भविष्यात दोन्ही देशांच्या संबंधांनाही नवी दिशा मिळेल अशा आशा व्यक्त केली जात आहे. सध्या या चर्चेने जागतिक राजकारणातील समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?
Ans: पंतप्रधान मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्जमध्ये भारत आणि व्हेनेझुएलातील द्विपक्षीय संबंध वाढविण्यावर चर्चा झाली.
Ans: निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाची ही पहिली आणि भारताशी उच्चस्तरीय चर्चा आहे, यामुळे जागतिक कुटनीतीसाठी ही चर्चा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.






