शरीरात दोन मूत्रपिंड असतात, ज्यांचे काम शरीरातील घाण काढून टाकणे आहे. जेव्हा मूत्रपिंड अर्थात किडनी खराब होते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. किडनी मजबूत करण्यासाठी तुम्ही आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता. या लेखात आम्ही काही महत्त्वाचे पदार्थ देत आहोत, जे खाल्ल्याने किडनी मजबूत होण्यास मदत मिळेल. मेडिकल न्यूज टुडेने दिलेल्या अभ्यासानुसार मूत्रपिंड मजबूत करण्यासाठी काय खावे ते जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
किडनी निरोगी राहण्यासाठी काही पदार्थांचे सेवन हे उत्तम ठरते. यासाठी नक्की कोणते पदार्थ खावेत हे मेडिकल न्यूज टुडेने दिलेल्या अभ्यासानुसार जाणून घेऊया
अननस हे किडनीसाठी अनुकूल फळ आहे. अननसाचे सेवन केल्याने किडनी आतून मजबूत होते. दररोज अर्धा कप अननसाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते
अंड्याच्या पांढऱ्या भागात फॉस्फरस आणि प्रथिने आढळतात जे किडनीसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे नियमित तुम्ही अंड्याचा सफेद भाग खाऊ शकता
लाल द्राक्षांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आढळतात जे किडनीसाठी फायदेशीर असतात. लाल द्राक्षे खाल्ल्याने किडनीची जळजळ कमी होते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज अर्धा कप लाल द्राक्षे खावीत
तुमच्या किडनी निरोगी ठेवण्यासाठी लाल शिमला मिरचीचे सेवन करा. लाल शिमला मिरचीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए आढळते
बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. बेरी खाल्ल्याने किडनीचे कार्य चांगले होते