Longevity Secret: दीर्षायुषी होणं कोणाला आवडत नाही आणि तेदेखील आजारी न पडता. ब्लू झोनमधील लोक कशा पद्धतीचे अन्न सेवन करून दीर्घायुषी होतात अथवा काय आहे त्यांच्या दीर्षायुष्याचं सिक्रेट हे आपण आज जाणून घेऊया. हार्वर्ड तज्ज्ञांचा विश्वास आहे की मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारी आहार घेतल्याने संभाव्य आयुष्य वाढते. ब्लू झोनमध्ये येणारे देश बऱ्यापैकी निरोगी मानले जातात. येथील जीवनशैली, आहार आणि शारीरिक हालचाली शरीरासाठी फायदेशीर ठरतात. येथे संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांचाआहार खूपच वेगळा आहे. इथले लोक चिकन आणि मटणापेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ खातात. ब्लू झोनच्या माहितीनुसार, 6 शाकाहारी पदार्थांना सर्वोत्तम दीर्घायुषी पदार्थ म्हटले जाते, कोणते आहेत पदार्थ जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
ब्लू झोन क्षेत्रातील लोकांचे आयुष्य हे दीर्षायुषी असून या भागात चिकन आणि मटणापेक्षा अधिक शाकाहारी पदार्थांचे सेवन केले जाते. नक्की हे पदार्थ कोणते आहेत आणि तुम्हालाही दीर्घायुषी व्हायचे असेल तर काय खावे जाणून घ्या
ब्लू झोन वेबसाइटनुसार, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ सल्लागार वॉल्टर विलेट म्हणतात की मांस हे रेडिएशनसारखे आहे, आम्हाला त्याची सुरक्षित पातळी माहीत नाही. संशोधनात असे दिसून आले आहे की शाकाहारी अन्न खाणारे लोक मांसाहार करणाऱ्यांपेक्षा 8 वर्षे जास्त जगतात
ब्लू झोनच्या डाएटमध्ये 6 भाज्यांचा समावेश करण्यात आला आहे. याला दीर्घायुष्यासाठी सर्वोत्तम पदार्थ म्हटले गेले आहे. यामध्ये पालक, केल, शलगमची पाने, चार्ड, कॉलर्ड्स आणि बीटासारख्या भाज्यांचा समावेश करण्यता आला आहे
पालकामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के 1, फॉलिक ॲसिड, लोह, कॅल्शियम यांसारखे प्रमुख पोषक घटक असतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते ज्यामुळे पेशींना नुकसान होते. यामुळे पालक नियमित खावे
शलमगच्या पानांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त असते. त्यामुळे तुमची त्वचा आणि केस निरोगी होतात. अशक्तपणा आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करते. याचा आपल्या आहारात समावेश करून घ्यावा
बीटरूट खाल्ल्याने नसा आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्यात नायट्रेट असते जे रक्तदाब नियंत्रित करते. हे अॅथलीटची कामगिरी आणि तग धरण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना सुधारण्यास मदत करते. हे तुमच्या पाचक आरोग्यासाठीदेखील चांगले मानले जाते
केल, चार्ड आणि कोलार्ड या तीन हिरव्या पालेभाज्या मधुमेह आणि कोलेस्टेरॉलच्या आजारांपासून संरक्षण करतात. हे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात. या सर्वांमध्ये कॅन्सरपासून संरक्षण करणारे अँटीऑक्सिडंट असतात