नागपुरात भाजपच भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश
नागपूर महापालिकेत १५१ जागा असून भाजपने तब्बल ३०० उमेदवारांना उमेदवारी अर्ज आणि कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेश दिले आहत. नागपूरमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्याठिकाणी एकापेक्षा जास्त सक्षम दावेदार आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. भाजपच्या उमेदवारांची यागी उद्या जाहीर होणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले आहे. नागपूर महापालिकेत एकूण १५१ जागा असून, युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसाठी सुमारे ८ ते १० जागा राखून ठेवल्यानंतर भाजप किमान १४० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागपुरात शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ ८ ते १० जागांवरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.
भाजपमध्ये अद्यापही अनेक जागांवर एकापेक्षा अधिक सक्षम दावेदार असल्याने पक्षश्रेष्ठींनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सुमारे ३०० कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज व संबंधित कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली. या ३०० पैकी कोणाला उमेदवारी मिळणार, हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय
दरम्यान, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढण्यावर जवळपास एकमत झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला १२९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना १२ आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला १० जागा देण्याच्या सूत्रावर स्थानिक नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. दुसरीकडे, नागपूरमध्ये भाजपकडून युतीसाठी विचारणा न झाल्याने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित यांच्यातील बोलणी सध्या सकारात्मक टप्प्यावर असल्याचे समजते.
दरम्यान, कालपासून महाविकास आघाडीच्या चर्चांना जोर वाढला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे शिवसेना आणि शदर पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गट आणि राष्ट्रवादील प्रत्येकी १२-१५ जागा सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. यासाठी मागील निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मते मिळाली होती, हा निकष यावेळच्या जागावाटपासाठी लावण्यात आला होता. मागील निवडणुकीत शिवसेनेला दोन नगरसेवक निवडून आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागील निवडणुकीत केवळ एक नगरसेवक निवडून आला होता. मात्र मतविभाजनामुळे काँग्रेसचे दहा ते पंधरा उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे यावेळी आघाडी करून मतविभाजनाचा धोका टाळण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते, तर जवळपास निम्मे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. आता उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभल्यास काँग्रेस आघाडीला मोठी ताकद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मागील महापालिका निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. राज्यात पुन्हा सत्तेत आल्याने आणि नगरपालिकेच्या निकालांमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असल्याचे चित्र आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेला १५ टक्के जागांचा प्रस्ताव भाजपने फेटाळल्याची माहिती आहे. सध्या शिवसेनेसह बोलणी सुरू असली तरी अद्याप युतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कोणत्याही पक्षाला अंतिम निरोप न मिळाल्याने शिवसेनेत मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.






