फोटो सौजन्य सोशल मिडिया
Jalgaon Water Cut : यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे, जळगाव महानगरपालिकेने शहरात 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार आज शनिवार पासून शहराच्या काही नियमित पाणी पुरवठ्यात 15 मिनिटांची घट करण्यात आली आहे. आता जळगाव शहरातील नागरिकांना 1 तास 30 मिनिटांऐवजी 1 तास 15 मिनिटेच पाणी मिळणार असल्याचे सांगितले जात आहेत.
त्याच बरोबर मुंबई, पुणे, जळगाव, सांगली, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा पाणी कपात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहेत. पाऊस कमी आल्याने राज्याच्या धरणामध्ये 10 टक्के पाणी साठा असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई, पुणे, जळगाव, सांगली, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा पाणी कपात करण्यात येणार आहे. आज पासून ही पाणी कपात केली जाणार आहे.
Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात फक्त 27 टक्के पाणी असल्याने 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहेत. राज्यात 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहेत. आँगस्ट 2027 पर्यंत पाणी आरक्षीत करणार असल्याचे सांगण्यात येत असून 72 टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने पाणी कपात करण्यात येणार आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने वाघूर धरणातील पाणीसाठा लक्षात घेता आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाण्याची टंचाई असल्यामुळे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्या येणार आहे. यासाठी मनपाकडून विशेष पथक नियुक्त केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्या नळांना तोट्या नाहीत, त्यांचे सर्वेक्षण करून तोट्या बसवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
यामध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर करून वाहने धुणे, रस्त्यांवर पाणी मारणे अशा अनावश्यक कारणांसाठी पाणी वाया घालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पाण्याची नासाडी वाढत राहिली तर हिवाळ्यातच टंचाईचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.






