रेखा म्हणजे सौंदर्याची मूर्ती असंच आजही म्हटलं जातं आणि प्रत्येकवेळी हे रेखाने तिच्या स्टाईलने सिद्ध केलं आहे. २५ डिसेंबरला जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो आणि मनिष मल्होत्राने इन्स्टाग्रामवर रेखाचे लालभडक ड्रेसमधील फोटो शेअर केल्यानंतर इंटरनेवर एकच चर्चा सुरू झाली. रेखाचा हा लुक कमालीचा आकर्षक आणि मनमोहक आहे. मनिष मल्होत्राने या लुकसह रेखाने घातलेल्या कपड्यांबाबत अधिक माहितीदेखील दिली आहे. डिकोड करूया रेखाचा हा ख्रिसमस लुक. तुम्हीही आजच्या पार्टीसाठी असा खास लुक करू शकता (फोटो सौजन्य - Instagram)
रेखा आणि सौंदर्य म्हणजे कमालीचे समीकरण. ख्रिसमसच्या दिवशी रेखाचे फोटो मनिष मल्होत्राने शेअर केले आहेत. वेलवेटच्या लाल रंगाच्या कपड्यांमध्ये रेखाने इंटरनेटवर आकर्षक लुकने आग लावली आहे

ख्रिसमस मूड सेट करणारा रेखाचा हा लुक वेलवेट ट्युनिकसह तयार करण्यात आला आहे. साडीची ही वेगळी स्टाईल रेखाला खूपच उत्तम दिसत आहे

रेखाने या वेलवेट लुकसह गोल्डन दागिने घातले आहेत. ब्रेसलेट्स, अंगठ्या, हार आणि कानातले असा लुक स्टाईल करण्यात आला आहे

रेखाने नेहमीप्रमाणे केस बांधले आहेत आणि त्यात लाल रंगाचे सिंदूर लावले आहे. तसंच तिने लाल रंगाचे नेलपेंट लावत या लुकला चारचाँद लावले आहेत

रेखाने या वेलवेट साडीसह त्याच रंगाचा वेलवेटचा बटवा घेतला आहे आणि तिची स्टाईल नेहमीप्रमाणे क्लासी ठेवली आहे

डार्क आयशॅडो, डार्क मेकअप, फाऊंडेशन, कन्सिलर, आयलॅशेस, काजळ, लायनर आणि डार्क लाल लिपस्टिक लावत रेखाने आपल्या सौंदर्यात भर घातली आहे






