Shreya Bugde: आपल्या विनोदाच्या परफेक्ट टायमिंगने सर्वांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. सध्या एका रियालिटी शो ची निवेदिका म्हणून श्रेया काम करतेय. आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर नेहमीच फोटो शेअर करत असते. उन्हाळ्यात घालवलेल्या सुट्ट्यांचे फोटो शेअर करत तिने सध्या आपण या आठवणीत रमलो असल्याचे सांगितले आहे. तर तिचा हा किल्लर लुक तुम्हीही कॅरी करू शकता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
श्रेयाची फॅशन आणि स्टाईल नेहमीच क्लासी असते. तिचा हा समर वेकेशन लुकदेखील परफेक्ट तिने कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ब्रालेट ब्लॅक क्रॉप टॉप अथवा ज्याला स्पगेटी स्ट्रॅप असंही म्हणता येतं घातले असून त्यासह तिने ब्लू डेनिम शॉर्ट्स घातले आहेत
तर दुसऱ्या फोटोमध्ये बॅकलेस ब्लॅक टॉपसह हॉटपॅंट मॅच केली आहे आणि त्यासह तिने गोलाकार खाकी टोपी आणि मॅचिंग पर्स घेत लुक पूर्ण केलाय
स्टायलिश व्हाईट फ्रेम असणारा गॉगल लावत श्रेयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. तर यासह तिने हलकासा मेकअपही केलाय
हाफ केस बांंधून त्यात चाफ्याचे फूल माळले आहे आणि तिचा हा लुक खूपच सुंदर आणि मनमोहक दिसतोय. श्रेयाने क्लासी आणि मासी असा लुक कॅरी केलाय
श्रेयाचा हा लुक कोणत्याही पिकनिक वा बीच वेकेशनसाठी परफेक्ट ठरू शकतो. तुम्हीही श्रेयाकडून या लुकची प्रेरणा घेऊ शकता