तेजस्विनी लोणारीने काही दिवसांपूर्वीच समाधान सरवणसह साखरपुडा उरकला. तेव्हापासून तिच्या लग्नाची तारीख नक्की कधी याची चाहते वाट पाहत होते आणि 4 तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी तेजस्विनी आणि समाधान लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दरम्यान आज पारंपरिक अंदाजात कुटुबियांच्या सोबतीने अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारीची हळद पडली पार पडली आहे. पिवळ्या साडीत तेजस्विनीचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. अगदी साधेपणात आणि पारंपरिक अंदाजात तेजस्विनीची हळद झाल्याचे दिसून येत आहे. पहा तेजस्विनीचे खास फोटो (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
तेजस्विनी लोणारी दत्त जयंतीच्या दिवशी समाधान सरवणकरसह लग्नगाठ बांधत आहे. नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पाडला असून घरगुती पद्धतीने हळदी समारंभही झालाय

सिल्व्हर एम्ब्रॉयडरी असणाऱ्या पिवळ्या साडीत आणि हळद लागलेल्या लुकमध्ये तेजस्विनीने सौंदर्य खुलून आले आहे

अगदी पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हळदीचा हा समारंभ पार पडलाय

तेजस्विनीने हातात हिरवा चुडा भरला असून अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने सोन्याच्या बांगड्यांसह परफेक्ट मॅच केलाय, नवरीचा चेहऱ्यावरील ग्लो अगदी दिसून येतोय

पिवळ्या साडीसह तेजस्विनीने फुलांचे दागिने घातले आहेत. गळ्यात हार, कानातले, मांगटिका आणि हातातील फुलांचा बाजूबंद अप्रतिम दिसतोय

अगदी साधी हेअरस्टाईल करत तिने आंबाडा घातलाय आणि त्यात गजरा माळला आहे. साधेपणातच तेजस्विनीने चाहत्यांचे मन जिंकून घेतलंय






