आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येतात जेव्हा माणसाला आयुष्य सार्थक झाल्यासारखे वाटते. त्यातीलच एक जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे बाप बनणे. पण वाढते प्रदूषण फक्त आयोग्यासंबंधित समस्यांनाच आमंत्रित करत नाही तर यामुळे पुरुषांच्या बाप बनण्यावर सुद्धा गदा येऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. पण नुकतीच एक स्टडी करण्यात आली ज्यात असे दिसून आले आहे की जर पुरुष पाच वर्षांमध्ये सरासरी 2.9 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर पीएम 2.5 प्रदूषणाच्या संपर्कात आले तर त्यांच्या वंध्यत्वाचा धोका 24% वाढतो.
वाढते प्रदूषण का ठरत आहे पुरुषांसाठी धोक्याचे(फोटो सौजन्य: iStock)

संपूर्ण प्रजनन प्रक्रिया प्रभावित: वायू प्रदूषणामुळे हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. हे प्रजनन तंत्राच्या सर्व टप्प्यांवर परिणाम करु शकते.

स्त्रियांच्या ओव्युलेशनवर परिणाम: प्रदूषणामुळे फक्त पुरुषच नव्हे तर महिलांच्या ओव्युलेशन सायकलमध्येही गडबड होऊ शकते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते.

पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमी होणे: वायू प्रदूषणामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि गणना कमी होऊ शकते. धुंवापासून आणि अन्य हानिकारक पदार्थांपासून शुक्राणूला नुकसान होऊ शकते.

गर्भपाताचा धोका वाढवणे: प्रदूषणामुळे गर्भाशयातील रक्तप्रवाह कमकुवत होऊ शकतो, ज्यामुळे गर्भपाताचे प्रमाण वाढू शकते.

आरोग्यावर परिणाम: प्रदूषणाचे दीर्घकालीन परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतात, ज्यामुळे प्रजनन क्षमता घटू शकते.






