Middle East War : इराणवरील हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा; दूतावासाने जारी केली नियमावली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय दूतावासाने इस्रायलमधील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्वांमध्ये भारतीय नागरिकांना इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भारतीय नागरिकांना २४ तास सतर्क राहण्यास सांगण्यता आले आहे. मध्यपूर्वेत परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तसेच पूढली सुचना मिळेपर्यंत प्रवास टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
तसेच इराणमधील नागरिकांना देखील भारताने सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने, कारण नसल्यास घराबाहेर न पडण्याचा आणि गरज पडल्यास दूतावासाछी संपर्क साधण्याचा सल्ला आपल्या नागरिकांना दिला आहे. यासाठी दूतावासाने आत्पकालीन हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत, भारतीय नागरिकांना खालील क्रमांकांवर मिशनशी संपर्क साधू शकतात
+989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359
इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर अनेक ठिकाणी हल्ले केले आहे. यामध्ये गुप्तचर मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि अणु उर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच सय्यद खानदान भागातही भीषण स्फोट झाले आहेत. यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावारण असून इराणने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे इराणने देखील इस्रायली हल्ल्याचे प्रत्युत्तर याच वेळी इस्रायल-अमेरिकेने संयुक्तपण केलेल्या हल्ल्याला इराणने देखील प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर एकामागून एक ७० क्षेपणास्त्रे डागली आहे. यामुळे संपूर्ण तेल अवीवमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्धा पुकारले आहे. तसेच इराणला आत्मसमर्पण करण्याचाही इशारा दिला आहे. इराणला कोणत्याही परिस्थिती अण्वस्त्र मिळवू दिली जाणार नाहीत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Ans: तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
Ans: इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर तेहारनमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती दूतावासाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.






