बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या चित्रपटाच्या कमाईमुळे बॉक्स ऑफीसचे अनेक रेकॉर्ड तुटले आहेत. त्यांचे असे देखील काही चित्रपट आहेत ज्याची गाणी चित्रपटापेक्षा जास्त सुपरहिट झाली आहेत. आजा आम्ही तुम्हाला अशाच एका गाण्याबद्दल सांगणार आहोत. खरं तर या गाण्याचं शुटींग करण्यासाठी अमिताभ यांनी आधी नकार दिला होता. मात्र जेव्हा हे गाणं रिलीज झालं तेव्हा त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. (फोटो सौजन्य – Pinterest)
20 वर्षांपूर्वीतचं ते हिट गाणं, ज्याला Amitabh Bachchan ने दिला होता नकार! आजही गाणं वाजताच थिरकू लागतात लोकांचे पाय
आज आम्ही तुम्हाला अशा एका गाण्याबद्दल सांगणार आहोत जे 20 वर्षांपूर्वी रिलीज करण्यात आलं होतं. मात्र आजही हे गाणं वाजताच लोकांचे पाय थिरकू लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणं करण्यासाठी आधी अमिताभ यांनी नकार दिला होता.
2005 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘बंटी और बबली’ चित्रपटातील ‘कजरा रे’ गाण्याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या गाण्यात अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन पाहायला मिळतात.
या चित्रपटाचे डायरेक्शन शाद अली यांनी केलं होतं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी जेव्हा अमिताभ यांना हे गाणं ऐकण्यासाठी बोलावलं तेव्हा त्यांनी शाद अली यांना सांगितलं की हे गाणं चालणार नाही.
अमिताभ बच्चन यांना थोडी शंका होती की हे गाणे हिट होणार नाही, पण त्यांना हे माहित नव्हते की हे गाणे भविष्यात लोकांच्या मनावर राज्य करणार आहे. अमिताभ बच्चन यांनी नंतर शूटिंग करण्यास सहमती दर्शवली, पण ते त्यावर पूर्णपणे समाधानी नव्हते.
पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील गाण्याने लोकांच्या मनावर राज्य केलं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गाण्याचे खूप कौतुक झाले.