भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून महिलांच्या नाकात, पायात, हातामध्ये दागिने होते. महिला सौंदर्य आणखीन वाढवण्यासाठी आणि चार चौघांमध्ये खुलून दिसण्यासाठी टिकली, नेकलेस, कानातले, पैंजण, मंगळसूत्र इत्यादी अनेक वेगवेगळे दागिने घालतात. पण महिलांचे खरे सौंदर्य खुलवते ती म्हणजे टिकली. लग्न झाल्यानंतर टिकली लावणे बंधनकारक असते. पण टिकली लावल्यामुळे सौंदर्यत वाढ होते मात्र आरोग्याला सुद्धा फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला टिकली लावल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात,याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य-pinetrest)
कपाळावर टिकली लावण्याचे फायदे
महिला कपाळाच्या मध्यभागी टिकली लावतात. त्यामुळे तुमचा चेहरा उठावदार आणि सुंदर दिसतो. टिकली कपाळाच्या मध्यभागी लावली जाते म्हणून तिला अजना चक्र असे सुद्धा म्हणतात.
टिकली हे शरीरातील सहावे आणि शक्तीशाली चक्र आहे, असे मानले जाते. कपाळावर टिकली लावल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात.
नियमित टिकली लावल्यामुळे शरीराची एकाग्रता वाढण्यास मदत होते.शिवाय डोके दुखी थांबते.
सणासुदीच्या दिवसांमध्ये अधिक सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी महिला वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या लावतात.बाजारात विविध रंगाच्या आणि आकाराच्या टिकल्या उपलब्ध आहेत.
काही महिला टिकली लावतात, तर काहींना मेण किंवा लाल गंध आणि कुंकू लावण्याची सवय असते. पूर्वीच्या काळी महिला टिकली म्हणून लाल गंध आणि कुंकू लावत होत्या. मात्र हळूहळू याच गंध आणि मेणाचे टिकलीमध्ये रूपांतर झाले.