Stock Market: जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध (फोटो-सोशल मीडिया)
Stock Market: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर आणखी कर वाढवण्याच्या ताज्या इशाऱ्यामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स ३२२ अंकांनी घसरला, तर निफ्टी ७८ अंकांनी घसरला. व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या ताज्या इशाऱ्याचा भावनेवर परिणाम झाला आणि बँकिंग, आयटी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आल्याचे विश्लेषकांनी सांगितले. ३० शेअर्सचा बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स ३२२.३९ अंकांनी किंवा ०.३८ टक्क्यांनी घसरून ८५,४३९.६२ वर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान एका टप्प्यावर, तो ४४६.६८ अंकांनी घसरून ८५,३१५.३३ च्या नीचांकी पातळीवर बंद झाला. दरम्यान, एनएसईचा ५० शेअर्सचा बेंचमार्क निफ्टी २६,३७३.२० अंकांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर, त्याची वाढ टिकवून ठेवू शकला नाही आणि ७८.२५ अंकांनी किंवा ०.३० टक्क्यांनी घसरून २६, २५०.३० वर बंद झाला.
विदेशी बाजार दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय निर्देशांक वाढीसह बंद झाला, तर हाँगकाँगचा हँग सँग किरकोळ वाढ झाल्याची दिसून आली. सोमवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात रुपया घसरला, ८ पैशांनी घसरून ९०.२८ प्रति डॉलरवर बंद झाला. मजबूत अमेरिकन चलन आणि मंदावलेल्या देशांतर्गत शेअर बाजारांचा रुपयावर भार पडला. व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपामुळे उस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे जागतिक डॉलरची मागणी वाढली, असे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले. तथापि, कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळे भारतीय चलनाला खालच्या पातळीवर काही आधार मिळाला.
हेही वाचा: India-Israel Trade: भारत–इस्रायल व्यापाराला मिळणार नवी चालना; एसबीआयकडून रुपयांत होणार व्यवहार सुलभ
मात्र, मंगळवारी भारतीय शेअर बाजार सकारात्मक उघडले असून गुंतवणूकदारांना आशेचा किरण दिसत आहे. तसेच, दिवसभर सकारात्मक परिस्थिति असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या काही अंदाजामुळे गुंतवणूकदार आनंदी असून आशियाई शेअर बाजारातील वाढत्या अथवा स्थिर तेजीचा मागोवा घेत, भारतीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीसह मिश्रित किंवा सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने गुंतवणूकदार थोडी सावध पवित्रा घेत असल्याचेही दिसून येत आहे.






