असुर म्हणजे अधर्मी! आणि अधर्मापासून धर्माचे रक्षण करणारे देव! पुराणांमध्ये असुर आणि देव, हे नेहमीच एकमेकांच्या विरोधात दाखवले गेले आहे. पण नवल असे की हे दोघे एकमेकांच्या नात्यातले आहेत. ते ही दूरचे नाही, रक्ताचे बरं का! कसे? हे समजून घेण्यासाठी बातमी नक्की वाचा.
असुर आणि देव एकमेकांचे भाऊ? (फोटो सौजन्य - Social Media)

ऋषी कश्यप यांच्या १३ पत्न्या होत्या. या सगळ्या सख्या बहिणी होत्या. याच्या संततीतूनच दैत्य, देव, नाग तसेच विविध पक्षी-प्राण्यांची निर्मिती झाली.

दिती नावाच्या पत्नीकडून दैत्य म्हणजे असुरांची निर्मिती झाली तर आदिती नावाच्या पत्नीकडून आदित्य म्हणजेच देवांची निर्मिती झाली.

आई वेगवेगळ्या असल्या तरी वडील मात्र एकच "ऋषी कश्यप"! त्यामुळे देव आणि असुर स्वभावाने भिन्न असले तरी एकमेकांच्या आप्तभावण्ड म्हणजेच सावत्र भाऊ लागतात.

दोघांची राहण्याची पद्धत वेगवेगळी आहे. एक अधर्मी तर एक धर्माचा रक्षणकर्ता! एक आक्राळ तर एक देखणा!

पुढे जाऊन देवगण तसेच असुरांच्या संतती वाढत गेल्या आणि दोन्ही रक्ताने एक पण वेगवेगळे कुळ ठरले.






