अहमदनगर तालुक्यातील नगर–वांबोरी मार्गावर पिंपळगाव माळवी तलावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ५ कोटी रुपये खर्च करून नुकताच नवीन दगडी फरशी पूल बांधण्यात आला होता. परंतु या पुलाला अवघे पाच महिनेही पूर्ण झाले नाहीत, तोच पुलाची अवस्था अत्यंत निकृष्ट झाल्याचे चित्र समोर आले आहे.ग्रामस्थांच्या मागणीनुसार माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला होता. मात्र ठेकेदाराने दर्जामान पाळले नाही, असे आरोप ग्रामस्थांकडून होत आहेत. पुलावरच्या फरश्या तडकल्या असून काही भाग खचल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.