फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्यांच्या वाहनांवर ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवतात. अशीच एक ऑटो कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या मागणीनुसार दमदार कार्स ऑफर केल्या आहेत, ज्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. यात आता फेस्टिव्ह सिझन कंपनीसाठी बोनस ठरला आहे.
नवरात्रीपासून दिवाळीपर्यंतच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये टाटा मोटर्सने उल्लेखनीय विक्री नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या 30 दिवसांच्या कालावधीत कंपनीने 1 लाखांहून अधिक वाहनांचे वितरण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ही कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 33 टक्क्यांनी अधिक असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले.
विदेशी ग्राहकांना ‘या’ Made In India कारचे वेड! डिमांड एवढी की 1 लाख युनिट्स झाले निर्यात
टाटा मोटर्सच्या एसयूव्ही मालिकेने या वाढीचे नेतृत्व केले असून, टाटा नेक्सॉनने सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील क्रमांक 1 विक्री होणारी कार ठरली आहे. नेक्सॉनने या कालावधीत 38000 हून अधिक युनिट्सची विक्री करत 73% वार्षिक वाढ साधली. दुसरीकडे, टाटा पंचने 32000 युनिट्सची विक्री नोंदवली असून 29% वार्षिक वाढ साध्य केली आहे. या आकडेवारीवरून भारतीय ग्राहकांच्या पसंतीचा कल स्पष्टपणे एसयूव्ही विभागाकडे वळत असल्याचे दिसून येते.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, “या उत्सवाच्या काळात आमच्या ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) पोर्टफोलिओने देखील उल्लेखनीय वाढ दर्शवली आहे. आम्ही या कालावधीत 10000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली असून, त्यात 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही, टिगोर ईव्ही आणि पंच ईव्ही यांसारख्या मॉडेल्समुळे ग्राहकांमध्ये ईव्हीबद्दलचा विश्वास वाढला आहे.”
अक्षरशः ‘या’ बाईक चालवून चालवून थकाल पण पेट्रोल नाही संपणार! 100 किमीचा मायलेज आणि किंमत…
टाटा मोटर्सने अलीकडेच आपल्या संपूर्ण उत्पादन मालिकेत AI आधारित तंत्रज्ञान, कनेक्टेड कार फिचर्स आणि प्रगत सुरक्षा मानके समाविष्ट केली आहेत. कंपनीचे लक्ष केवळ विक्री वाढविण्यावर नसून, ग्राहकांना दीर्घकालीन मूल्य आणि विश्वास देण्यावर आहे.
या विक्रमी आकडेवारीमुळे टाटा मोटर्सने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, भारतीय ग्राहकांच्या मनात ‘विश्वास’ आणि ‘भारतीय नवोन्मेष’ यांचे सर्वोत्तम प्रतिक म्हणजे टाटा मोटर्सच आहे.