India Bangladesh Relations : ढाका / नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेशात (Bangladesh) पुन्हा तणावाचे संबंध दिसून येत आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Mohammad Yunus) यांनी तीस्ता नदीवरुन मोठा डाव खेळला आहे. चीनच्या पाठिंब्याने बांगलादेशने तीस्तावर प्रोटेस्ट सुरु केले आहे. यामुळे भारतासाठी बांगलादेशचा हा तीस्ता मास्टर प्लॅन चिंतेचा विषय बनत आहे.
डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा खुपसले नाक! भारत रशियाकडून डिसेंबरपर्यंत तेल खरेदी करणार बंद
गेल्या आठवड्यात चितगाव विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांनी तीस्ता मास्टर प्लॅनची अमंलबजावणी करण्याची मागणी निदर्शनांमध्ये केली आहे. हा चीन-समर्थित प्लॅन ढाकामध्ये भारताच्या रखडलेल्या पाणी वाटप कराराला पर्याय मानला जात आहे.
तीस्ता नदी ही सिक्कीमधून उगम पावते आणि पुढे पश्चिम बंगालमधून वाहत बांगलादेशात प्रवेश करते आणि अखरेसी ब्रह्मपुत्रा नदीला जाऊन मिळते. या नदीच्या पाणी वाटपावरुन भारत आणि बांगलादेशात गेल्या अनेक दशकांपासून वाद सुरु आहे. सध्या १९९६ सालचा गंगा जल वाटप करार लागू आहे. हा करार २०२६ मध्ये संपुष्टाक येणार आहे. अशा वेळी बांगलादेश चीनच्या मदतीने तीस्ता नदीवरली मास्टर प्लॅन अमलांत आणथ आहे. यामुळे भारताच्या जलसुरक्षा आणि सीमासुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
या तीस्ता वादात चीनचा (China) सहभाग भारतासाठी धोरणात्मक आव्हान ठरत आहे. या प्लॅनअंतर्गत बांगलादेश तीस्ता नदीवर मोठे धरण बांधण्याची आणि नदीचे पाणी साठवण्याची योजना आखत आहे. यामुळे बांगलादेशचे भारतावरील अवलंबित्व कमी करायचे असा याचा हेतू आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात बंगलादेश ६,७०० कोटी खर्च करणार आहे. यासाठी चीनने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. बांगलादेशातील अनेक राजकीय पक्षांनी, नॅशनलिस्ट पार्टींना या योजनेला पाठिंबा दिला आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा?
भारतीय तज्ज्ञांच्या मते, तीस्ता प्रकल्प सिलीगुडी कॉरिडॉरच्या म्हणजेच ज्याला चिकने म्हणून ओळखले जाते याच्या अत्यंत जवळ आहे. ही भारताची अतिशय सुदंर पट्टी आहे. येथी देशाच्या इशान्येकडील राज्य भारताच्या भागांशी जोडले जातात. या राज्यांना भारताच्या बहिणी म्हणूनही ओळखले जाते. परंतु चीनच्या तीस्ता नदीवरील प्रकल्प या राज्यांच्या जवळ असल्याने भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनकडून या भागात उपग्रह नियंत्रण आणि निरिक्षण होण्याची आणि भारतावर नजर ठेवली जाण्याची शक्यता आहे.
शिवाय मार्च २०२५ मध्ये बांगलादेशच्या अंतरिम सरकारने चीनला ५० वर्षेांच्या तीस्ता योजनेच्या व्यवस्थानपनाची मागणी केली आहे. यामुळे हा एक भारतविरोधी मोठा डाव असल्याचे आणि चीनला थेट भारताच्या चिकन नेक पर्यंत नेण्यासाठी मार्ग खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. ही परिस्थिती भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. काय आहे बांगलादेशचा तीस्ता मास्टर प्लॅन?
बांगलादेश तीस्ता नदीवर चीनच्या मदतीने मोठे धरण बांधण्याची आणि नदीचे पाणी साठवण्याची योजना आखत आहे, ज्यातून भारतावरील अवलंबित्व कमी होईल.
प्रश्न २. तीस्ता मास्टर प्लॅनचा भारतावर काय परिणाम होईल?
बांगलादेशच्या तीस्ता मास्टर प्लॅनमुळे भारताच्या जलसुरक्षा आणि सीमासुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारताच्या शेजारी राहून नवी खेळी; नवीन बांगलादेश किती घातक अन् धोकादायक?