जगभरात असे अनेक गेम्स आहेत, जे मोबाईलवर मोठ्या उत्साहाने खेळले जातात. पण काही असेही गेम्स आहेत, जे खेळण्याची इच्छा तर असते पण खेळताना उत्साहाचे तीन तेरा वाजले जाते. कारण, हे गेम खेळताना मनामध्ये असते ती फक्त भीती आणि भीतीच! एका मोठ्या भयानक अशा घरात जाऊन खेळावे लागतात हे गेम. चला तर मग जाणून घेऊयात 'या' रहस्यमयी मोबाईल गेम्सबद्दल:
रहस्य आणि हॉरर अनुभवांनी भरलेले Mobiles Games. (फोटो सौजन्य - Social Media)
जर तुम्ही गेम्स लव्हर्स असाल तर तुम्ही 'Amnesia: The Dark Descent' या गेमबद्दल नक्कीच ऐकले असेल. हा गेम रहस्यमयी Puzzles आणि त्याच्या युनिक Game play त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी ओळखला जातो.
'Alien Isolation' हा Game त्याच्या युनिक ग्राफिक्ससाठी प्रसिद्ध आहे. या गेममध्ये एलियन आपल्याला एका भीतीदायक वातावरणात घेऊन जातो. आपल्याला त्या वातावरणाशी लढा देत एलियनसह बाहेर पडायचे असते.
जर तुम्ही हॉरर सिनेमा किंवा गेमी लव्हर असाल तर 'Dead Space 2'चा अनुभव नक्की घ्या. या गेममध्ये उच्च दर्जाचे ग्राफिक्स वापरले गेले आहेत, जे Real Horror अनुभव देतात. भयंकर जगाचा एक अनोखा अनुभव देणारा हा गेम फार प्रसिद्ध आहे.
जर तुम्हाला हॉरर गोष्टींची भीती वाटते. तर तुम्ही 'IMSCARED: A Pixelated Nightmare' या गेमपासून लांबच राहणेच उत्तम ठरेल. असे म्हणतात कि या गेमपासून मिळणार अनुभव इतका भीतीदायक आहे की सत्यातही लोकांना भीती वाटते.
असे अनेक गेम्स इंटरनेटवर उपल्बध आहेत. या गोष्टींची आवड असणारे उत्साही खेळाडू असे गेम्स आनंदाने खेळतात तर काही यांपासून लांब राहणेच योग्य समजतात.