नात्याला फुटणाऱ्या नव्या पालवीचा अनुभव – ‘बेबी ऑन बोर्ड’चा ट्रेलर रिलीज
सागर केसरकर (Sagar Kesarkar) लिखित, दिग्दर्शित ‘बेबी ऑन बोर्ड’ (Baby On Board Trailer) नुकताच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यात प्रतिक्षा मुणगेकर (Pratiksha Mungekar) आणि अभिजीत आमकर (Abhijeet Aamkar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी ओरिजनल्स (Planet Marathi Originals), फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत ‘बेबी ऑन बोर्ड’ या सीरिजमध्ये सिद्धार्थ आणि श्रुती यांच्या नात्याला फुटणारी नवी पालवी त्यांच्या आयुष्यात विविध बदल घडवताना दिसत असून प्रेग्नेंसीमध्ये श्रृतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून सिद्धार्थची धडपड, काळजी यात दिसत आहे. ‘बेबी ऑन बोर्ड’ २८ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.