जर तुम्ही इंग्रजी सिनेमा प्रेमी असाल तर तुम्ही Apocalypto हे नाव नक्कीच ऐकले असाल, जर नाही तर हा प्रसिद्ध सिनेमा तुम्ही नक्कीच पाहिला पाहिजे. अनेकांना या सिनेमातील दृश्य ज्ञात असतील कारण सोशल मीडियावर अनेक इतर क्लिप्समध्ये ते वापरले जातात.
Apocalypto हा सिनेमा नक्की पहा. ( फोटो सौजन्य - Social Media )
तर Apocalypto हा सिनेमा मायान संस्कृतीवर आधारित आहे. तेथील जमाती आणि त्यांच्या चित्र विचित्र प्रथा यांचा उल्लेख या सिनेमा मध्ये करण्यात आला आहे.
हा सिनेमा 2006 सालात प्रदर्शित झाला होता. त्या काळात सिनेमाने प्रचंड थैमान घातले होते. या सिनेमाची लाट आणखीन काही कमी झाली नाही.
सिनेमामध्ये दोन वेगवेगळ्या जमाती दाखवण्यात आल्या आहेत. एक जमात दुसऱ्या दुबळ्या घटकाला पकडून त्यांचा बळी देत असत.
त्यातील मुख्य पात्राने या सर्व जीवघेण्या प्रकारातून स्वतःची केलेली मुक्ती या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
या सिनेमात अतिशय विकृत दृश्य दाखवण्यात आले आहेत. मिनिटा मिनिटाला येथे फक्त मृत्यू आणि मृत्यूंचं तांडव दाखवण्यात आलं आहे. सिनेमाचे आणखीन भाग आहेत. हा सिनेमा यूट्यूबवर उपलब्ध आहे. सिनेचाहत्यांनी नक्कीच पहावे.