सध्या सगळीकडे लग्नसराईचा मोठा उत्साह आहे. या दिवसांमध्ये मंगळसूत्राची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. काही महिलांना पेंडेंट असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात तर काहींना वाटी असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात. तसेच लग्न झालेल्या महिला साडी नेसल्यानंतर गळ्यात सुंदर सुंदर दागिने घालतात. त्यामध्ये मंगळसूत्र हा दागिने आवडीने परिधान केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील वाटी डिझाइन्सचे काही मंगळसूत्र दाखवणार आहोत. या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा. (फोटो सौजन्य –pinterest)
वाटी मंगळसूत्राच्या सुंदर डिझाइन्स
दक्षिण भारतामध्ये नवीन नवरीला या प्रकारचे मंगळसूत्र गळ्यात घातले जाते. यात काळ्या मण्यांचा वापर केला जातो. शिवाय या मंगळसूत्रामधील वाट्यांची डिझाईन अतिशय युनिक आहे.
मोठ्या मंगळसूत्रामध्ये या डिझाईन्सच्या वाट्या अतिशय सुरेख दिसतील. गोल किंवा चोकोनी आकाराच्या वाट्या मंगळसूत्रामध्ये सुंदर दिसतात.
या डिझाईन्सच्या वाटी मंगळसूत्रावर लहान आकाराचा रुबी आणि माणिक लावून घेण्यात आला आहे. तुम्ही असे मंगळसूत्र रोजच्या वापरात घालू शकता.
काहींना नाजूक साजूक डिझाईन असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात. त्यामुळे तुम्ही रोजच्या वापरात या डिझाईन्सच्या वाट्या असलेले मंगळसूत्र बनवून घेऊ शकता.
तुम्हाला जर जास्त हेवी लुक हवा असेल तर तुम्ही मंगळसूत्रामध्ये या प्रकारच्या वाट्या बनवून घेऊ शकता. यावर सोन्याचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.