सर्वच महिला आणि मुली सण समारंभाच्या वेळी हातावर मेहंदी काढतात. मेहंदी काढल्यामुळे हातांचे सौदंर्य अधिक उठावदार आणि सुंदर दिसते. सणासुदीच्या दिवसांमध्ये हातांवर मेहंदी नसेल तर हात मोकळे वाटतं. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीमधील प्रेम आणि अतूट नात्याचा सण. या खास प्रसंगी हातावर मेहंदी ही असायलाच हवी. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला हातावर मेहंदी काढण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सिम्पल आणि क्लासी डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स तुम्ही हातावर नक्की काढून पहा.(फोटो सौजन्य-instagram)
रक्षाबंधनला हातावर काढा 'या' सुंदर मेहंदी डिजाइन्स

सध्या सगळीकडे अरेबिक आणि हिना मेहंदीचा ट्रेंड आहे. हातावर कमीत कमी डिझाईन काढून त्यात बारीक नक्षीकाम केले जाते. पानाफुलांच्या वेली काढल्या जातात. त्यामुळे हातावर तुम्ही ही मेहंदी डिझाईन नक्कीच काढू शकता.

पेस्ले पॅटर्नमध्ये काढलेल्या मेहंदीला कश्मीरी बूटी असे म्हणतात. भारतामध्ये या प्रकारच्या मेहंदी डिझाइन्स खूप प्रसिद्ध आहेत. ही मेहंदी हातावर काढल्यानंतर एक स्टयलिश आणि सिम्पल लुक दिसतो.

फ्लॉवर-लीफ डिझाईन्स असलेली मेहंदी हातांवर खूप शोभून दिसते. पानाफुलांच्या डिझाइन्स काढून तुम्ही ही मेहंदी हातावर काढून त्यात भावला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

काही मुलींना संपूर्ण हात भरून मेहंदी काढायला खूप आवडते. बारीक नक्षीकाम केलेली मेहंदी हातांवर खूप छान दिसते. संपूर्ण भरलेल्या मेहंदीमध्ये मनगटापासून बोटांपर्यंत मेहंदी काढली जाते.

कमीत कमी वेळात हातांवर जाली वर्क काढलेली मेंहदी तुम्ही काढू शकता. ही मेहंदी काढण्यासाठी फार कमी वेळ लागतो. या मेहंदी डिझाइन्समध्ये तुम्ही बारीक जाळ्यांची आकर्षक मेहंदी हातांवर काढू शकता.






