सध्या आपल्यातील प्रत्येकाला सोशल मिडीयाचं व्यसन लागलं आहे. आपण दर 5 मिनिटाला कोणत्या तरी सोशल मिडीया अॅपचा वापर करतो. आपण आपली प्रत्येक गोष्ट सोशल मिडीयावर शेअर करतो. सोशल मिडीयामुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. माणसांमधील एकटेपणा वाढला आहे. तुम्ही देखील सोशल मिडीयाच्या आहारी गेला असाल तर योग्य वेळी यातून बाहेर पडा.
सोशल मिडीयाच्या सवयीने हैराण झालात? सोशल मिडीयापासून दूर राहण्यासाठी या टीप्स करतील मदत (फोटो सौजन्य - pinterest)
AI च्या आगमनानंतर सोशल मीडियावर लोकांचा वेळ आणखी वाढला आहे. लोकांच्या जीवनात सोशल मीडियाचा खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे लोकांसाठी मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होत आहेत.
सोशल मीडियाच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक ध्येय निश्चित करावे लागेल. यानंतर सोशल मीडियाचा वापर का करावा लागतो हे पाहावे लागेल. गरज नसल्यास, तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तुमचे अकाऊंट बंद करू शकता.
जर तुम्ही सोशल मीडियाच्या सवयीमुळे त्रस्त असाल तर दिवसातील काही वेळ तुम्ही सोशल मिडीयापासून बाजूला ठेवू शकता. तुम्ही दिवसातून एक तास किंवा दिवसातील काही वेळ सोशल मिडीयासाठी निश्चित करू शकता.
सोशल मीडियापासून दूर राहण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवर स्क्रीन टाइम मोड असणे. या फीचरच्या माध्यमातून फोनवर घालवलेला वेळ सहज मॅनेज केला जाऊ शकतो. दिवसभरात निर्धारित मर्यादा ओलांडली तर लगेच फोनपासून दूर राहा.
सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी अत्यावश्यक नसलेले ॲप फोनमधून काढून टाकावेत. फोनमध्ये ॲप असेल तर ते वापरावेसे वाटेल. अशा परिस्थितीत, डिव्हाइसमधून नको असलेले ॲप काढून टाका.
जर तुम्हाला सोशल मीडियाचे खूप व्यसन असेल तर तुम्ही एखाद्या व्यावसायिकाची मदत घेऊ शकता. एक चांगला व्यावसायिक तुम्हाला सोशल मीडियापासून दूर राहण्यास मदत करू शकतो. असे केल्याने मानसिक स्थितीही तणावमुक्त राहते.