बाॅलिवूड अभिनेत्री अर्चना पूरनसिंग गेल्या अनेक वर्षांपासून 'द कपिल शर्मा शो' सोबत जोडल्या गेल्या आहेत. अर्चना आधी 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये होत्या. त्यांना इंडस्ट्रीमध्ये लाफ्टर क्वीन म्हणून देखील ओळखले जाते. आपल्या निखळ हास्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अर्चनाशी संबधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
सासूच्या निधनानंतरही हसत होती अर्चना पूरनसिंग, पतीने केला खुलासा
कपिल शर्माच्या शो'मध्ये जोरजोरात हसण्यावरून अर्चना नेहमीच चर्चेत असते. एकीकडे यावरून ट्रोल होत असताना तिचं हे हसण शो'ला एक वेगळी ओळख मिळवून देत
मात्र तिच्या या हसण्यामागे तिने अनेक दु:ख दडवून ठेवलेली आहेत, ज्याची कोणाला कल्पनाही नाही. अर्चनाने नुकतंच इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे.
अर्चनाने सांगितले की, सेटवर शूटिंग सुरु असतानाच तिला तिच्या सासूच्या निधनाची बातमी मिळाली. मात्र तरीही यानंतर तिने हसत हसत तिचं शूटिंग पूर्ण केलं
तिने सांगितल, मी तेव्हा फार हसली. मला माहिती नाही की, मी त्यावेळी कशी हसत होती.तुम्ही जेव्हा 30-40 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करता तेव्हा तुम्हाला निर्मात्यांचा किती पैसा लागला आहे याची जाणीव असते. तुम्ही मधेच काम सोडून जाऊ शकत नाही.
पती परमितनेही त्यावेळी अर्चनाची स्थिती जाणून घेतली. त्याला फक्त 15 मिनिटं हवी होती असं तिने सांगितले.
सासूच्या निधनानंतर मी ब्लँक झाली. माझ्या डोक्यात फक्त सासूचा मृत्यू आणि शाॅट्स देणं या दोनच गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. दु:खाच्या वेळी तिला जबरदस्ती हसावं लागलं असं तिने म्हटलं.