आगामी बॉलीवूड सिनेमे : कोरोनानंतर सिनेमा प्रेमींनी बॉलीवूड आणि टॉलिवूड चित्रपटांना भरभरून प्रेम दिले आणि प्रेक्षक सिनेमे पाहण्यासाठी चित्रपटगृहांपर्यत पोहोचले होते. अनेक सिनेमांनी रेकॉर्डब्रेक कमाई करत निर्माते आणि दिग्दर्शकांचे खिसे भरले. आता नुकताच प्रदर्शित झालेला स्त्री चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची वाहवाह केली. आता पुढील काही महिन्यांमध्ये अनेक मोठे चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहेत. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश असणार आहे. बॉलीवूड प्रेक्षकांसाठी कोणत्या नव्या चित्रपटांची मेजवानी असणार आहे याकडे एकदा नजर टाका.
पाहा बॉलीवूडचे आगामी सिनेमे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
छावा - विकी कौशलचा आगामी सिनेमा छावा या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, या सिनेमाचे विकी कौशल आणि त्याच्या टीमने प्रमोशन सुरु केले आहे लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांसाठी सिनेमा गुहांमध्ये येणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
देवारा - शाहिद कपूरचा आगामी सिनेमा देवारा या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, यामध्ये शाहिद कपूर एका वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सिंघम अगेन - रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमा सिंघम अगेन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हा सिनेमा मल्टीस्टार सिनेमा असणार आहे. यामध्ये अनेक मोठे कलाकाराचा समावेश आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
धडक २ - सैराट या सिनेमाचा रिमेक धडक या सिनेमा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. आता धडक २ मध्ये सिद्धांत चतुर्वेदी पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भूल भुलैया ३ - भूल भुलैयाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे, यामध्ये पहिल्या भागामध्ये अक्षर कुमार आणि दुसऱ्या भारतामध्ये कार्तिक आर्यन या दोन्ही कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. तिसऱ्या भागामध्ये काय नवीन असणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया