चित्रपटांचे विश्व फार वेगळे आणि अनोखे आहे. आपण चित्रपट पाहतो मात्र यातील अनेक गोष्टी आपल्या नजरेसमोरुन जात असतात. चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आले, ज्यात आपल्याला कलाकारांचे डबल रोल पाहायला मिळाले. अशातच आज आम्ही तुम्हाला बाॅलिवूडमधील काही अशा चित्रपटांविषयी सांगत आहोत, ज्यात कलाकारांनी एक नव्हे दोन नव्हे तर एकाच चित्रपटात अनेक भूमिका साकारल्या. एका चित्रपटामध्ये तर कलाकाराने तब्बल 45 भूमिका साकारल्या...
सेलिब्रिटीज ज्यांनी एकाच चित्रपटात साकारल्या अनेक भूमिका; एकाने तर बनवला 45 चा रेकॉर्ड
या यादित सर्वात प्रथमस्ठानी 2018 मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट आरानु नजानचा समावेश आहे. यात जाॅनसन जाॅर्ज याने तब्बल 45 भूमिका साकारत एक वर्ल्ड रेकाॅर्ड बनवला
यानंतर या यादित बाॅलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा समावेश आहे. अभिनेत्रीने 'वाट्स यॉर राशी' चित्रपटात एकूण 12 भूमिका साकारल्या होत्या
नामवंत अभिनेते कमल हसन यांनी 'दशावतार' चित्रपटात एकूण 10 भूमिका साकारल्या आहेत
अभिनेते संजीव कुमार यांनी 'नया दिन नई रात' या चित्रपटात एकाहून अधिक म्हणजेच एकूण 9 भूमिका साकारल्या
बाॅलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा याने 'हद कर दी आपने' चित्रपटात, एका सीनमध्ये 6 भूमिका साकारल्या आहेत
दिग्ग्ज अभिनेते किशोर कुमार यांनी 'बढती का नाम दाढी' या चित्रपटात एकूण 5 भूमिका साकारल्या आहेत
प्रक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या माधूरी दिक्षितनेही एका चित्रपटात 5 भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचे नाव 'गज गामिनी' आहे