सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम्स, फेशिअल, फेसपॅक इत्यादी गोष्टी केल्यानंतर सुद्धा त्वचा चमकदार दिसत नाही. पण त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन आरोग्याची आणि त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला त्वचेला पोषण देण्यासाठी आणि सुंदर चमकदार त्वचेसाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)
सुंदर त्वचेसाठी आहारात करा 'या 'पदार्थांचे सेवन
त्वचेला पोषण देण्यासाठी दिवसाची सुरुवात आवळ्याच्या रसाने करावी. आवळ्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळवून चेहरा उजळदार होतो.
नाश्त्यामध्ये सुका मेवा, वेगवेगळी फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे दिवसभर पोट भरलेले राहते आणि संपूर्ण दिवस आनंदात जातो.
रात्रीच्या वेळी झोपण्याआधी बदाम दुधाचे सेवन करावे. यामुळे त्वचेवर चमक वाढते आणि त्वचेला योग्य ते पोषण मिळते.
पचनक्रिया सुधरण्यासाठी पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचेवर उष्णता, पिंपल्स येत नाहीत.
जेवणातील पदार्थांमध्ये काकडी, पुदिना, दही इत्यादी पदार्थांपासून बनवलेला रायता खावा. यामुळे त्वचेवर चमक वाढते आणि पिंपल्स कमी होऊन जातात.