स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक पर्सनल गोष्टी तसेच महत्त्वाचे दस्तऐवज असतात. अशा परीस्थितीत आपला फोन हॅक होणे फार महागात पडू शकते. अलीकडे सायबर गुन्हे फार वाढले आहेत. त्यामुळे आपण वेळीच सावध राहणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन हॅक झाला की नाही ते चेक करू शकता.
स्मार्टफोनमध्ये हे चिन्ह दिसणं म्हणजे फोन हॅक होणं, वेळीच सावध व्हा
Android स्मार्टफोनमध्ये असे एक फिचर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची प्रायव्हसी कोणी चोरत तर नाही किंवा तुमच्या कॅमेराचा ॲक्सेस कोणी घेतला की नाही ते समजेल
Android फोनमध्ये वरच्या बाजूस एक ग्रान डाॅट, मिना कॅमेरा आयकाॅन तेव्हाच दिसतो जेव्हा तो वापरात असेल
जर तुम्ही कॅमेराचा वापर नसाल तरीदेखील तुम्हाला तो आयकाॅन दिसत असेल तर त्याचा अर्थ कोणत्या दुसऱ्या व्यक्तीकडे याचा ॲक्सेस गेला आहे
मोबाईल हॅकींगचे हे साइन पाहिल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन App Permission तपासा
तिथे तुम्हाला नको असलेला किंवा संशयास्पद ॲप दिसत असेल ते परमिशन ॲक्सेस करत असेल तर ही परमिशन त्वरीत बंद करा