तुर्की सैन्याचे आयसिसविरुद्ध मोठे ऑपरेशन (फोटो- istockphoto)
सुरक्षा यंत्रणांचे आयसीसविरुद्ध सर्च ऑपरेशन
6 पेक्षा जास्त दहशतवादी केले ठार
13 प्रांतात 108 ठिकाणी छापेमारी
तुर्कीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणेने वायव्य तुर्कीमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा यंत्रणेने आयसिसविरुद्ध निर्णायक लढाई सुरू केली आहे. तुर्की सरकारच्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणेने देशातील 13 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली आहे.
तुर्कीमधील विविध भागातील ISIL शी संबंधित असणाऱ्या 108 ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत 6 दहशतवादी देखील ठार झाले आहेत. तर सुरक्षा दलांमधील तीन जवानांना प्राण गमवावे लागले आहेत. सुरक्षा यंत्रणेने आयसिसविरुद्ध आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणेने ही कारवाई केली आहे. इस्तंबूलच्या दक्षिण भागात रक्तरंजित कारवाई करण्यात आली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुरक्षा यंत्रणेने एका गावात एका घरावर छापा टाकला आहे. सुरक्षा पाठक घरात शिरताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
दहशतवाद्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त झाल्यावर सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. काही दहशतवादी गैर मुस्लिम समुदाय आणि देशातील जास्त प्रमाणात असलेल्या गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी करत होते. याआधी तुर्की सुरक्षा दलाने थेट 124 ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये 115 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.






