आषाढ महिना संपून लवकर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना सुरु होण्याची आधी दीप अमावस्या साजरा केली जाते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या प्रत्येक घरात साजरा करतात. यादिवशी घरात दिवे लावून दिव्यांची पूजा केली जाते. घरात असलेले दिवे व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ केले जातात. त्यामुळे यादिवशी घरात दिव्यांच्या बाजूने आणि अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दीप अमावस्येला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काही सुंदर दिव्यांच्या रांगोळीच्या डिझाईन सांगणार आहोत. या पद्धतीची रांगोळी नक्कीच अंगणात काढा.(फोटो सौजन्य – pintrest)
दीप अमावस्येला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी दारात काढा 'या' सुंदर डिझाईन्स रांगोळी
दीप अमावस्येला तुम्ही या डिझाईनची साधी सोपी आणि सुटसुटीत रांगोळी काढू शकता. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचा वापर करून मध्यमभागीं सुंदर समई किंवा दिवा काढू शकता.
घाईगडबडीच्या कमीत कमी वेळात काढून होणारा रांगोळी काढण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे संस्कार भारती रांगोळी काढून त्यात तुम्ही सुंदर दिवे किंवा इतर कोणतीही डिझाईन काढू शकता.
या डिझाईनची रांगोळी काढून मध्यभागी दिव्यांची सजावट केल्यास अंगण सुंदर वाटेल. तसेच वेगवेगळ्या रंगाचा वापर करून काढलेली रांगोळी अंगणात अतिशय उठावदार दिसते.
सणावाराच्या दिवसांमध्ये घरात फुले आणली जातात. मात्र शिल्लक राहिलेली फुले खराब करून फेकून देण्याऐवजी तुम्ही सुंदर फुलांची रांगोळी काढू शकता. यामुळे तुमच्या अंगणाची शोभा वाढेल.
दीप अमावस्येच्या दिवशी रांगोळीमध्ये तुम्ही लक्ष्मीची पाऊल काढू शकता. तसेच रांगोळी आणखीनच उठावदार दिसण्यासाठी रांगोळीमध्ये दिवे लावावे.