IND W vs AUS W (Photo Credit - X
IND W vs AUS W 1st ODI 2025: भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे ऑस्ट्रेलियाने अवघ्या ४४.१ षटकांत २ विकेट्स गमावून पूर्ण केले. या पराभवामुळे भारतीय महिला संघाची आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वीची चिंता वाढली आहे.
या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताची सलामीची जोडी स्मृती मानधना (५८) आणि प्रतिका रावल (६४) यांनी दमदार सुरुवात करत ११४ धावांची भागीदारी केली. यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हरलीन देओलनेही ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, या तिघींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने पुन्हा एकदा निराशा केली आणि ११ धावा करून ती बाद झाली. भारताने निर्धारित ५० षटकांत ७ विकेट्स गमावून २८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुट्टने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
Australia win the ODI series opener. #TeamIndia will aim to come back stronger in the second ODI of the series. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/Fw3TUl2thL#INDvAUS | @IDFCFirstBank pic.twitter.com/3Soxn1QgMg
— BCCI Women (@BCCIWomen) September 14, 2025
२८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी केली. फोएब लिचफील्डने ८० चेंडूत ८८ धावांची दमदार खेळी केली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर बेथ मूनी (७७*) आणि एनाबेल सदरलँड (५४*) यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. भारताकडून क्रांती गौड आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. फोएब लिचफील्डला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘प्लेयर ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळाला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.