रविवार म्हंटलं की आपल्याकडे मासे आणि चिकन या दोन मांसाहारी पदार्थांवर नॉनव्हेज खवय्यांकडून ताव मारला जातो. पण मुंबई आणि कोकणातील लोकं चिकन पेक्षा मासे खाणे जास्त पसंत करतात. सुरमई, पापलेट, बोंबील, मांदेली अशा माश्यांचे नावं जरी उच्चारले तरी मासेप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. नुकताच एक दावा करण्यात आला आहे ज्यात असे म्हंटले जात आहे की मासे खाणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका कमी असतो. पण खरंच यात तथ्य आहे का? चला जाणून घेऊया.
मासे खाल्ल्याने कमी होतो हार्ट अटॅक? जाणून घ्या

अमेरिकन हार्ट असोसिएशनने आठवड्यातून किमान दोनदा निरोगी चरबीयुक्त मासे खावे असा सल्ला दिला आहे. सर्व मासे प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनिरल यांचे चांगले स्रोत आहेत. पण चरबीयुक्त माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात.

ओमेगा-३ फॅटी ऍसिड हे फॅटी ऍसिडचे एक प्रकार आहेत. हे शरीरातील जळजळ कमी करू शकतात. ज्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.

आठवड्यातून किमान दोनदा मासे खाण्याचा प्रयत्न करा. विशेषतः असे मासे ज्यात ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर असतात. असे केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

अनेक प्रकारच्या सीफूडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् कमी प्रमाणात असतात. फॅटी फिशमध्ये सर्वात जास्त ओमेगा -3 फॅटी ऍसिड असते आणि ते हृदयासाठी सर्वात फायदेशीर असते.