फोटो सौजन्य: Pinterest
New Renault Duster चे डिझाइन पूर्णपणे नवीन असून ते ग्लोबल थर्ड जनरेशन मॉडेलवर आधारित आहे. बॉक्सी स्टान्स, उंच बोनट लाईन, मजबूत व्हील आर्च आणि बोल्ड फ्रंट ग्रिल यामुळे तिला खऱ्या अर्थाने SUV लुक मिळतो. LED DRL आणि फंक्शनल रूफ रेल्स तिचा रग्ड लुक आणखी उठावदार करतात. या SUV ची लांबी 4343 मिमी आहे.
जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स
दुसरीकडे, Toyota Hyryder अधिक मॉडर्न आणि अर्बन डिझाइनसह येते. स्प्लिट हेडलॅम्प्स, क्रोम एलिमेंट्स आणि स्लीक प्रोफाइल यामुळे ती शहरातील ग्राहकांसाठी आकर्षक ठरते. तिची लांबी 4365 मिमी असली तरी रफ-टफ लुकच्या बाबतीत Duster अधिक दमदार वाटते.
Duster चा केबिन पूर्णपणे रीडिझाईन करण्यात आला असून त्यात बॉक्सी डॅशबोर्ड, 10.1-इंच टचस्क्रीन, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि जास्त केबिन स्पेस मिळते. त्यामुळे ही SUV कुटुंबासाठी आणि लांब प्रवासासाठी अधिक प्रॅक्टिकल ठरते.
Hyryder चा इंटीरियर टेक्नॉलॉजीने समृद्ध असून 9-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले आणि प्रीमियम फील देण्यात आली आहे. मात्र स्टोरेज स्पेस आणि मॉड्युलॅरिटीच्या बाबतीत Duster पुढे आहे.
दोन्ही SUV मध्ये 6 एअरबॅग्स, ABS, ESC आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी महत्त्वाची सेफ्टी फीचर्स मिळतात. मात्र Duster मध्ये लेव्हल-2 ADAS, अॅडॅप्टिव क्रूझ कंट्रोल आणि लेन-कीप असिस्टसारखी प्रगत फीचर्स दिली असल्याने ती थोडी आघाडीवर आहे.
New Renault Duster चे स्ट्रॉन्ग हायब्रिड सेटअप अधिक पॉवरफुल असून चांगले एक्सीलरेशन देतो. तर Toyota Hyryder मायलेजच्या बाबतीत पुढे असून ती सुमारे 27 kmpl पर्यंतची इंधन कार्यक्षमता देते.
जर तुम्हाला जास्त पॉवर, रग्ड डिझाइन आणि अॅडव्हान्स फीचर्स हवे असतील तर New Renault Duster ही अधिक दमदार Hybrid SUV ठरते. मात्र मायलेज, स्मूथ ड्रायव्हिंग आणि अर्बन कम्फर्ट तुमची प्राथमिकता असेल तर Toyota Hyryder हा उत्तम पर्याय आहे.






