सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण रिकाम्या पोटी या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये. उपाशी पोटी अन्नपदार्थ खाल्यामुळे ॲसिडिटी, अपचन, वजन वाढणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. शिवाय नाश्ता करताना शरीराला पचन होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य-istock)
रिकाम्या पोटी चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
रिकाम्या पोटी फळांचा किंवा इतर कोणताही ज्यूस प्यायल्यामुळे फळांमध्ये आढळून येणारे आवश्यक घटक निघून जातात. शिवाय फायटोन्यूट्रिएंट्सची पातळी कमी होण्यास सुरुवात होते.
मसालेदार आणि तिखट पदार्थ शरीरासाठी हानिकारक आहेत. या पदार्थांच्या सेवनामुळे अपचन, ऍसिडिटी आणि पोटदुखी, डायरिया, गॅस, ब्लोटिंग इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अतिमसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने किंवा चहाचे होते. मात्र अतिप्रमाणात चहा प्याल्यामुळे आरोग्य बिघडते. तसेच रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत जाते.
लिंबूवर्गीय फळांचे सेवन रिकाम्या पोटी करू नये. यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. ज्यामुळे ॲसिडीटी, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.
आरोग्यासाठी दही अतिशय गुणकारी आहे. यामध्ये उच्च प्रोबायोटिक गुणधर्म आढळून येतात. पण रिकाम्या पोटी दह्याचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त तयार होते ज्यामुळे अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास होतो.