चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे शरीरात नकारात्मक बदल दिसून येतात. अतिप्रमाणात साखरेचे किंवा गोड पदार्थ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते, जे आरोग्यसाठी हानिकारक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात कोणत्या फळांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.(फोटो सौजन्य-istock)
मधुमेह झाल्यानंतर 'या' फळांचे करू नका सेवन
केळी खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. कारण यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. केळ्यांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी केळी खाऊ नये.
पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात चिकूचे सेवन करावे. पण यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे मधुमेह वाढू शकतो.
लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. पण चवीला गोड असलेली लिची मधुमेहासाठी घातक आहे. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते.
आकाराने लहान असलेली आंबट गोड द्राक्ष आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर आहेत. पण मधुमेह असलेल्या रुग्णांनी द्राक्षाचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा हे फळ खूप आवडत. चवीला गोड असलेला आंबा मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अतिशय घातक आहे. कारण यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक आढळून येते.