धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढत बाहेर फिरायला जाणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. बाहेर फिरायला गेल्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन शांत आणि प्रसन्न होते. जगभरात अनेक फिरण्याची ठिकाण आहेत तिथे गेल्यानंतर मनाला समाधान आणि शांती मिळते. भारतामधील हिमाचल प्रदेशात असलेल्या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक भारतामध्ये येतात. या मंदिरांना भेट दिल्यानंतर मनात भक्तीची आणि आनंदाची भावना निर्माण होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिमाचलमध्ये गेल्यानंतर कोणत्या मंदिरांना आवश्यक भेट दिली पाहिजे, याबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
निर्सगाच्या सानिध्यांत जाऊन भक्तीचा आनंद घ्याचा असेल तर 'या' मंदिरांना नक्की द्या भेट
दरवर्षी लाखो पर्यटक वैष्णवी देवी मंदिराला भेट देतात. याशिवाय जम्मू आणि काश्मीरचा निसर्ग पाहण्यासाठी तुम्ही तिथे जाऊ शकता.
सात बर्फाच्छादित शिखरे आणि हिमनदी सरोवराने वेढलेले हेमकुंड साहिब हे उत्तराखंड मधील सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे. इथे गेल्यानंतर मनाला वेगळेच समाधान मिळते.
गंगोत्री -यमुनोत्री हे गंगा आणि यमुना नद्यांचे उगमस्थान असून इथे दोन नद्या एकत्र आल्या आहेत. त्यामुळे गंगोत्री आणि यमुनोत्री या नद्यांच्या उगम स्थानाला आवश्यक भेट द्या.
उत्तराखंडमधील सगळ्यात प्रसिद्ध असलेले एक मंदिर म्हणजे बद्रीनाथ. बद्रीनाथ हे भगवान विष्णूला समर्पित असलेले मंदिर असलेले मंदिर आहे.
हिमाचलमध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराला आवश्यक भेट द्या. हे भगवान शंकराचे मंदिर आहे. केदारनाथ मंदिराला बर्फाच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे.