हसणं आपल्या आरोग्यासाठी चांगल मानलं जातं. माणसाचं खरं साैंदर्य हे त्याच्या हास्यात दडलेलं असतं. संशोधनात असं आढळून आलं आहे की, हास्य आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्यास मदत करते. अशातच आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका देशाविषयी माहिती सांगत आहोत, जिथली लोक सर्वात जास्त हसणारी लोक आढळली जातात. चला हा कोणता देश आहे ते जाणून घेऊया.
जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?
गॅलपची 2023 ग्लोबल इमोशंस रिपोर्ट सांगते की, इंडोनिशिया, मेक्सिको, पॅराग्वे, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम हे देश सर्वात जास्त हसणाऱ्या देशांमध्ये सामील होतात. या देशातील लोक परिस्थिती कशीही असली तरी त्यात हसत राहण्याचा, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतात
इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारखे देश गरिबी, बेरोजगारी आणि कष्टांशी झुंजत आहेत. तरीही, येथील लोक नेहमीच आनंदी आणि हसतमुख असतात.
कदाचित त्यांची हीच गोष्ट त्यांना कठीण काळातही समाधानी राहण्यास आणि जीवनशैली सोपी करण्यास मदत करते.
मेक्सिको आणि पॅराग्वे सारख्या देशांमध्ये लोक एकमेकांना भेटल्यावर हसतात. हा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. या संशोधनात ग्वाटेमाला, पनामा, एल साल्वाडोर, कोस्टा रिका आणि मलेशिया सारख्या देशांचाही समावेश होता.
आनंदी देशांविषयी बोलणं केलं तर या यादित फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड सारख्या देशांचाही समावेश आहे पण अहवालानुसार, जगात सर्वाधिक हसणाऱ्या लोकांची संख्या इंडोनेशियामध्ये अधिक आहे.