दारूचा नशा हा जगातील सर्वात धोकादायक नशांपैकी एक मानला जातो. म्हणूनच कधी 'ड्रिंक आणि ड्राईव्ह करू नका' असे म्हटले जाते. मात्र अनेकदा आपण पाहिले असेल कि, माणूस जेव्हा दारु पितो तेव्हा तो आपलेया मनातील अनेक गोष्टी उघड करतो. इच्छा नसतानाही त्याच्या तोंडून सत्य बाहेर येते. त्यामुळे दारु पिऊन एका प्रकारची 'लाय डिटेक्टर टेस्ट' करता येईल का? याबाबत तज्ञांचे काय म्हणणे आहे, ते जाणून घ्या.
दारू प्यायल्यानंतर माणूस खरं बोलू लागतो का? काय सांगते विज्ञान? जाणून घ्या
ठीक-ठाक प्रमाणात दारु प्यायल्यानंतर माणसाचा आपल्या जिभेवर ताबा राहत नाही. पण याचा अर्थ असा नाही कि ते नशेत असताना नेहमीच जे काही बोलतात ते खरे आहे. नशेत असलेला माणूस त्याला जे 'खरे' वाटते तेच बोलतो, पण ते खरे असेलच असे नाही.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अब्यूज अँड अल्कोहोलिझममधील एपिडेमियोलॉजी आणि बायोमेट्री शाखेचे नेते ॲरॉन व्हाईट म्हणतात, दारु प्यायल्याने आपण आपल्या मनातील गोष्टी उघड करण्यास अधिक इच्छुक होतो. काही बाबतीत या गोष्टी खऱ्या असू शकतात तर काही काही बाबतीत या गोष्टी फक्त त्या व्यक्तीच्या मनातील खोट्या भावना असू शकतात.
अल्कोहोल आणि प्रामाणिकपणा यांच्यातील संबधांवर थेट कोणताही अभ्य्यास झालेला नाही. मात्र काही संशोधनातून व्यक्तिमत्व, भावना आणि मेंदूवर अल्कोहोलचा काय परिणाम होतो याबद्दल बरेच काही दिसून आले आहे.
2017 मध्ये 'क्लिनिकल सायकोलॉजिकल सायन्स' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात मद्यपानामुळे लोकांच्या व्यक्तिमत्त्वात कसा बदल होतो याचा शोध घेण्यात आला आहे.
दारु पिल्यानंतर सर्वात मोठा होणारा बदल म्हणजे, माणसाचे बहिर्मुख होणे. त्या संशोधनात अल्कोहोल खरोखर सत्य सीरम आहे की नाही हे शोधले नाही. परंतु याचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीला सामाजिक वातावरणात अधिक सोयीस्कर वाटते ती व्यक्ती दारू पिल्यानंतर स्पष्टपणे बोलण्याची शक्यता असते.
दारु लोकांना त्यांच्या शेलमधून बाहेर येण्यास मदत करते. यामुळे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करणे सोपे जाते. यामुळे अनेकदा लोकांवर विचित्र परिस्थिती आढावली जाते जिथे लोक नकाे ते बोलून बसतात आणि मग त्यांनी त्यांच्या वागण्याचा मनापासून पश्चात्ताप होऊ लागतो.