संपूर्ण देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. याशिवाय नवरात्रीमध्ये उपवास करताना अनेक वेगवेगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे टाळले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नवरात्रीमध्ये कोणत्या भाज्या आणि पदार्थ खाल्ले जात नाहीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ नेमके का खाल्ले जात नाहीत यामागील जाणून घ्या वैज्ञानिक कारण. (फोटो सौजन्य – istock)
नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
नवरात्रीचा उपवास केल्यानंतर कांदा लसूण अजिबात खाल्ला जात नाही. हे दोन्ही पदार्थ तामसिक मानले जातात. तामसिक पदार्थ बहुतेकदा आळस, राग आणि वासना यांच्या भावनांशी संबंधित असतात, त्यामुळे नवरात्रीमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही.
नवरात्रीमध्ये बीन्स, चणे, टोमॅटो, वांगी, फुलकोबी, ब्रोकोली आणि पालेभाज्या खाल्ल्या जात नाहीत. या भाज्या पचनासाठी अतिशय जड असतात. त्यामुळे ऍसिडिटी किंवा पचनाच्या समस्या उद्भवतात.
लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोबीची भाजी खायला आवडत नाही. नवरात्रीच्या उपवासात कोबीच्या भाजीचे अजिबात सेवन करू नये.
नवरात्रीच्या उपवासात अनेक लोक वांगी खाणे टाळतात. मशरूम खाल्ल्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि उलट्या यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.
उपाव केल्यानंतर फुलकोबी, कोबी आणि ब्रोकोली या भाज्यांचे अजिबात सेवन करू नये. उपाशी पोटी या भाज्या खाल्यामुळे अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.