सर्वच महिलांना साडी नेसायला खूप आवडते. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी कोणत्याही कार्यक्रमात महिला सुंदर साडी नेसून तयार होतात. मात्र बऱ्याचदा साडी नेसताना ती व्यवस्थित नेसली जात नाही. साडीचा गोळा होणे किंवा साडीचा पदर व्यवस्थित न येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि चापून चोपून साडी नेसण्यासाठी डॉली जैन यांनी सांगितलेल्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून साडी नेसल्यास तुम्ही सुंदर आणि आकर्षक दिसाल. (फोटो सौजन्य – pinterest)
डिझायनर किंवा पैठणी साडी व्यवस्थि ड्रेप करण्यासाठी डॉली जैन यांनी सांगितल्या सोप्या टिप्स
साडी नेसण्याआधी साडीला इस्त्री करावी. इस्त्री न करता कधीच साडी नेसू नये. इस्त्री केलेली साडी अंगावर व्यवस्थित बसते, ज्यामुळे सुंदर लुक येतो.
साडीच्या निऱ्या काढताना खालच्या भागात एखादा जाड कपडा जोडावा. यामुळे साडीच्या निऱ्या कितीही धावपळ केली तरीही सुटत नाही. तसेच साडीच्या निऱ्या व्यवस्थित बसता.
साडीला इस्त्री करायला वेळ नसेल तर तुम्ही नेहमी स्टीम आयर्न करून साडी नेसू शकता. साडीचा सुळसुळीतपणा कमी होऊन साडी अंगावर व्यवस्थित बसते.
साडी नेसताना साडीला ४ ठिकाणी पिना लावाव्यात. ज्यामुळे बराच वेळ साडी अंगावर व्यवथित राहील. साडी बराच वेळ अंगावर व्यवस्थित राहण्यासाठी साडीला पिन लावावे
वर्षाच्या बाराही महिने महिला साडी नेसतात. त्यामुळे ब्लाऊजमध्ये नेहमी अंडरआर्म पॅडचा वापर करावा. काखेत येणाऱ्या घामामुळे ब्लाऊज खराब होण्याची शक्यता असते.