धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. रक्तात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीराला धोका निर्माण होतो. रक्तात वाढलेले चरबीचे थर रक्तवाहिन्या ब्लॉक करते, ज्याच्या परिणामामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे रक्तात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तात साचून राहिलेली अनावश्यक चरबी नष्ट होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – istock)
रक्तवाहिन्यांना चिकलेले घाणेरडे Cholesterol नष्ट करण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ, कोलेस्ट्रॉपासून मिळेल कायमची सुटका

सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कायमच ओट्स खाल्ले जातात. ओट्स खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. यामुळे असलेले विषारी घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात.

बदाम आणि अक्रोड इत्यादी पदार्थ हृदयासाठी अतिशय गुणकारी आहेत. अक्रोड रक्तवाहिन्यांची लवचिकता करण्यास मदत करते तर बदाम खाल्ल्यामुळे रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते.

उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डॉक्टर सुद्धा लसूण खाण्याचा सल्ला देतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक कच्चा लसूण चावून खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.

ग्रीन टीमध्ये कॅटेचिनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे हृदय कायमच निरोगी राहते. हृदय तरुण ठेवण्यासाठी दिवसातून दोन कप ग्रीन टी प्यावी.

भेंडीसारख्या पातळ भाज्यांमध्ये म्युसिलेज नावाचा पदार्थ असतो. यामध्ये असलेले घटक पचनक्रियेदरम्यान कोलेस्टेरॉलशी बांधले जाते आणि रक्तात विरघळण्याऐवजी विष्ठेद्वारे बाहेर पडून जातात.






