धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराची योग्य काळजी घेतली जात नाही. सतत काम, चुकीच्या वेळी जेवण, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे आरोग्य बिघडते. शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर बऱ्याचदा सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, मात्र कालांतराने शरीरात बदल जाणवू लागतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दीर्घकाळ फ्रेश आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)
गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित खा 'ही' फळे, शरीर राहील फ्रेश आणि तंदुरुस्त

सकाळच्या नाश्त्यात नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीर कायमच आजारांपासून दूर राहील. सफरचंदामधील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारतात.

पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित पपई खावा. सकाळच्या नाश्त्यात वाटीभर पपई खाल्ल्यास ऍसिडिटी,बद्धकोष्ठता आणि पचनाच्या सर्वच त्रासापासून कायमची सुटका मिळेल.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीदार फळांचा आहारात समावेश करावा. कलिंगड खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच पोटात वाढलेली जळजळ शांत होते. याशिवाय शरीरातील पाणी संतुलित राहते.

सकाळच्या नाश्त्यात नियमित २ केळी खावी. यामध्ये असलेल्या फायबर, पोटॅशियम आणि इतर आवश्यक घटकांमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

आठवड्यातून एकदा तरी आहारात फळांचे सॅलड किंवा चाट बनवून खावे. हंगामी फळे खाल्ल्यामुळे शरीराला तात्कळ ऊर्जा मिळते आणि शरीरात वाढलेला थकवा कमी होतो.






