शिरा, खीर किंवा गोड पदार्थ बनवल्यानंतर त्यात वेलची पावडर टाकली जाते. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी वेलची पावडरचा वापर आवश्यक केला जातो. यामध्ये असलेले घटक पदार्थांची चव आणि सुगंध वाढवतात. जेवणानंतर नियमित एक किंवा दोन वेलचीचे दाणे चावून खाल्यास अपचन किंवा ऍसिडिटी होणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणानंतर नियमित वेलची खाल्यास आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हिरव्या वेलचीचा वापर चहा, बिर्याणी किंवा खीर यांसारखे विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. (फोटो सौजन्य – istock)
जेवणानंतर नियमित चावून खा 'हा' हिरवा पदार्थ
जेवल्यानंतर पचनाची समस्या उद्भवणे हे अतिशय सामान्य झाले आहेत. वारंवार पोटात दुखणे, ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर वेलची किंवा वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे अन्न लवकर आणि पूर्णपणे पचन होण्यास मदत होते.
तोंडात वाढलेल्या दुर्गंधीमुळे बऱ्याचदा लाजिरवण्यासारखे वाटू लागते. तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी कोणत्याही माऊथ फ्रेशनरचा वापर न करता वेलचीचे सेवन करावे. यामुळे हिरड्या देखील स्वच्छ होतात.
मानसिक तणावांमुळे काहींना लवकर झोप येत नाही. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे सेवन करावे. वेलची खाल्यास झोपेची समस्या दूर होईल आणि शांत झोप लागेल.
उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात वेलचीचे सेवन करावे. वेलचीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरावर वाढलेले फॅट कमी होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात.