अनेकांना जेवणाच्या ताटात चमचमीत आणि तिखट पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मसालेदार पदार्थ भारतीय जेवणातील अतिशय महत्वाचा घटक आहे. हिरवी मिरची आणि लाल मसाल्याचा वापर करून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. पण झणझणीत आणि खूप जास्त तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो आणि अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. मिरचीतील कॅप्सायसिनमुळे तिखटपणा जाणवतो, पण कॅप्सायसिन शरीरातील विशिष्ट रिसेप्टर्सना सक्रिय करतात, ज्यामुळे पोटात जळजळ वाढते. चला तर जाणून घेऊया अतिमसालेदार पदार्थ खाण्याचे तोटे. (फोटो सौजन्य – istock)
तिखट- मसालेदार पदार्थ जास्त खाता? मग शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम, वाढतील पचनाच्या समस्या

अतिप्रमाणात मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे आहारात कमीत कमी तिखट आणि तेलकट पदार्थ खावेत.

अति तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे तोंडात किंवा घशात जळजळ वाढते. त्यानंतर काहींना छातीत जळजळ, पोटदुखी किंवा पोटात अस्वस्थता जाणवते आणि वाढत्या अपचनाच्या त्रासामुळे शरीरात अनेक बदल दिसू लागतात.

ज्या व्यक्तींचे पोट खूप जास्त संवेदनशील आहे, अशांनी आहारात तिखट किंवा अतिमसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नयेत. यामुळे छातीत जळजळ, जुलाब, पोटदुखी होऊ शकते.

वारंवार उलट्या, जुलाब किंवा अपचनाचा त्रास वाढत असेल तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते.

तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे वारंवार पोटदुखी, आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा जुलाब होत असतील तर तिखट पदार्थ अजिबात खाऊ नये.






