
आतड्यांचा प्रत्येक कोपरा होईल मुळांपासून स्वच्छ! डॉक्टर सौरभ सेठींनी सांगितलेले 'हे' उपाय ठरतील प्रभावी
कॅन्सर होण्यास कोणते पदार्थ कारणीभूत ठरतात?
कॅन्सर होऊ नये म्हणून कोणत्या सवयी फॉलो कराव्यात?
गंभीर आजाराची लागण कशामुळे होते?
दरवर्षी जगभरात लाखोंच्या संख्येने लोकांना पोटाच्या कॅन्सरची लागण होते. सर्वाधिक रुग्ण पोट, आतड्यांच्या कॅन्सरचे आढळून येतात. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सुद्धा अनेकांच्या पायाखालील जमीन सरकते. हा आजार वाढण्यामागे केवळ आनुवंशिक कारणे नसून दैनंदिन जीवनात केलेल्या चुका सुद्धा कारणीभूत ठरतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे अतिसेवन, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रोजच्या आहारात आणि जीवनशैलीत होणारे बदल गंभीर आजारांचे कारण बनतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या गंभीर आजारांचे संकेत असतात. त्यामुळे दुर्लक्ष करू नये. बाहेरील अस्वच्छ अन्नपदार्थ आणि दूषित पाण्याच्या सेवनामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारांपासून दूर राहण्यासाठी डॉ सौरभ सेठींनी सांगितलेले हे उपाय नक्की करून पहा. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून तुम्ही कायमच दूर राहाल.
दैनंदिन आहारात ताज्या आणि शरीरास पोषण देणाऱ्या भाज्यांचे सेवन करावे. यामध्ये ब्रोकली, कोबी, फ्लॉवर आणि केल यांसारख्या क्रुसीफेरस भाज्यांचा आहारात समावेश केल्यास पचनाच्या समस्या कधीच उद्भवणार नाहीत. या भाज्या पचनक्रिया मजबूत ठेवतात. क्रुसीफेरस भाज्यांमध्ये सल्फोराफेन नावाचा शक्तिशाली घटक आढळून येतो. ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यासोबतच आतड्यांचे अरींगचे आरोग्य सुद्धा सुधारते. आतड्यांमध्ये जमा झालेला घाण बाहेर काढून टाकण्यासाठी वेगवेगळे सल्फोराफेन भाज्या आणि पालेभाज्यांचे सेवन करावे. या भाज्या हलक्या प्रमाणात शिजवून सेवन करू शकता. यामुळे पोट सुद्धा दीर्घकाळ भरलेले राहील.
लसूण हा पदार्थ अत्यंत शक्तिशाली आणि शरीरासाठी फायदेशीर आहे. उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कच्चा लसूण चावून खावा. यामुळे रक्तातील घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते. लसूणमध्ये असलेले ‘एलिसिन’ नावाचे नैसर्गिक संयुग कॅन्सरविरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू नये म्हणून लसूण खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो.या पदार्थांमध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे शरीराला कोणत्याही गंभीर विषाणूची लागण होत नाही.
कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणारा पदार्थ म्हणजे लाल मांस. लाल मांस शरीरासाठी हानिकारक आहे. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी विष ठरतात. त्यामुळे लाल मांस अजिबात खाऊ नये. बेकन, सॉसेज आणि हॉट डॉग यांसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. या पदार्थांच्या सेवनामुळे आतडे आणि पोटाच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. लाल मांस खाल्ल्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे लाल मांस खाणे कायमच टाळावे.
Ans: सतत पोटात जळजळ होणे किंवा अस्वस्थ वाटणे.कोणतेही कारण नसताना वजन घटणे.
Ans: सर्वच कर्करोगात वेदना होत नाहीत. वेदना झाल्यास त्या ट्यूमरमुळे (गाठीमुळे) होऊ शकतात आणि आधुनिक उपचार पद्धतींनी वेदना नियंत्रित करता येतात.
Ans: जनुकांमधील बदल (उदा. BRCA1, BRCA2) स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढवू शकतात. मात्र, जीवनशैलीचाही मोठा वाटा असतो.